तरुणाईत केस पांढरे होण्याचे आणि गळण्याचे कारणंआणि त्यावरील उपाय

0 0
Read Time:9 Minute, 27 Second

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या केसांमध्ये (केसांचा रंग , प्रमाण आणि त्यांची जाडी ) वयानुसार बदल होत असतात. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले केस काळे असतात. काहींचे तपकिरी तर काहींचे लालसर असतात. जसे जसे आपले वय वाढत जाते, तसे तसे आपले केस पातळ व राखाडी आणि नंतर पांढरे होतात . केसांचे प्रमाण कमी होऊ लागते, काहींना टक्कल ही पडते.

केसांसंबंधी अनेक प्रश्न आपल्याला पडतात.

वयानुसार केस पांढरे का होतात ?

आपण आपल्या केसांचा रंग पांढरा होण्यापासून थांबवू शकतो का ?

कमी वयाच्या ही मुलामुलींचे केस पांढरे का होतात ?

अश्या काही प्रश्नांची उत्तरे इथे लिहिली आहेत. तत्पूर्वी , केसांबद्दल थोडीशी माहिती :

आपले केस हे शरीरातील केराटिन (KERATIN ) नावाच्या प्रथिनांपासून (PROTEIN ) बनलेले असतात. तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्व ‘सस्तन’ प्राण्यांना आपल्या शरीरावर कुठे ना कुठे केस असतात? अगदी देव माश्या पासून ते गेंड्या पर्यंत सर्वांनाच ! तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेंड्याच्या नाकावरचे शिंग हे अनेक केसांचा एक घट्ट जुडा असतो ! आहे कि नाही आश्चर्यकारक !

असो. आता माणसाच्या डोक्यावरच्या केसांबद्दल असणाऱ्या प्रश्नांकडे पाहूया .

विशेष बाब म्हणजे, आपल्या केसांचा मूळ रंग पांढराच असतो. आपल्या त्वचेवर (skin) एका विशेष प्रकारच्या कोशिकांचा ( cell ) चा थर असतो. या कोशिकांमध्ये काळ्या रंगाचे कण (melanin ) असतात (त्यामुळे यांना कृष्ण कोशिका म्हणतात ). हे कण आपल्या केस कोशिकांमध्ये शिरकाव करतात आणि आपल्या केसांना काळे करतात. हा शिरकाव विशेष फाट्यांने होतो.

तर , जस जसे आपण वयस्कर होत जातो, तसे हे फाटे लहान होतात आणि काळ्या रंगाचे कण कमी होत जातात. यामुळे , केसांना आपल्या मूळ रंगात (पांढऱ्या) यावे लागते.

कमी वयात केस पांढरे का होतात ? आणि आपण यावर काही करू शकतो का ?

सर्व प्रथम , हे कळणे गरजेचे आहे की, कमी वय म्हणजे नेमके किती ?

२००१ च्या एका संशोधनानुसार जर गौर वर्णीय (अमेरिकन, युरोपिअन )लोकांना २० वर्षाच्या आत ; आफ्रिकन लोकांना ३० वर्षाच्या आत आणि आशियाई (भारतीय) लोकांना जर  २५ वर्षाच्या आत केस पांढरे झाले तरच आपण कमी वयात पांढरे केस झाले असे म्हणू शकतो.

आता कमी वयात केस पांढरे होण्याचे मुख्य कारणे पाहूया :

Embed from Getty Images

जर आपल्या आई वडिलांचे किंवा आजी आजोबांचे कमी वयात केस पांढरे झाले असतील तर आपलेही केस कमी वयात पांढरे होऊ शकतात.

दुर्दैवाने आपण यावर कोणताही उपाय करू शकत नाही . आपण फार फार तर केसांना लावायचा रंग वापरू शकतो.  

२. धूम्रपान:

Embed from Getty Images

एका संशोधनानुसार , तीशीच्या आत पांढरे केस होणे आणि धूम्रपान यांचा सरळ संबंध आहे. 

असे का होते ?

एका प्रसिद्ध वेबसाईट नुसार , धुम्रपान केल्यामुळे आपल्या शरीरात विषारी पदार्थ जातात , ज्यांच्यामुळे केस काळे होणे थांबते. त्याच बरोबर धूम्रपान हे हृदयावर व फुफ्फुसांवर दुष्परीणाम करतो. त्यामुळे , पाहिजे त्या प्रमाणात केस वाढीसाठी रक्त पोहचत नाही, परिणामी केसांचे गळणे वाढते.

धूम्रपान थांबल्याने केस गळती आणि केसांचे पांढरे होणे थांबण्याचे अद्याप वैज्ञानिक प्रबळ पुरावे नाहीत.

३.व्हिटॅमिन बी -१२ ची कमतरता:

Embed from Getty Images

व्हिटॅमिन बी १२ ( बी जीवनसत्व ), हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. साधारण पणे, मांसाहार करणाऱ्या लोकांना याची कमतरता कमी जाणवते.

या जीवनसत्वाची एक विशेषता आहे. जर हे जीवनसत्व आपल्या शरीरात कमी असेल तर आपले शरीर इतर जीवनसत्व शोषून घेण्यासअसमर्थ ठरते.

जेव्हा बी १२ शरीरात कमी असते, त्या वेळेस रक्ताच्या पेशी (red blood cells ) केस कोशिकांपर्यंत ऑक्सिजन नेण्यास असमर्थ ठरतात. त्याच बरोबर, मेलॅनिन ( काळे कण ) ही पुरेश्या प्रमाणात तयार होत नाहीत. या मुळे केसांची वाढ खुंटते आणि ते पांढरे होतात.

४. थायरॉईड ग्रंथी चे अव्यवस्थित  कार्य

Embed from Getty Images

आपल्या शरीरात अनेक ग्रंथी असतात , ज्या अनेक प्रकारची रसायने शरीरात सोडतात. या रसायनांमुळे शरीरात होणाऱ्या अनेक प्रक्रियांना मदत होते. या रसायनांना आपण संप्रेरक ( hormones ) म्हणतो. या पैकी एक ग्रंथी म्हणजेच थायरॉईड होय. हि ग्रंथी आपल्या गळ्यात असते.

संप्रेरकांचे प्रमाण हे समतोल असणे गरजेचे आहे.

ज्यावेळी थायरॉईड ग्रंथी कमी किंवा अधिक प्रमाणात आपल्या शरीरात  हार्मोन्स  सोडते , त्या वेळी मेलॅनिन ( काळे कण ) पुरेश्या प्रमाणात तयार होत नाहीत , परिणामी आपले केस पांढरे होतात.

हॉर्मोन थेरपी ने केस पुन्हा काळे होण्यास सुरुवात होऊ शकते.

५. भावनिक ताण – तणाव ( स्ट्रेस )

Embed from Getty Images

‘फोर्ब्स’ च्या एका आर्टिकल नुसार , आपल्या केस कोशिका एकतर आराम करत असतात किंवा केस वाढवण्याची प्रक्रिया करत असतात. साधारण पणे , वाढणाऱ्या केसांची संख्या जास्त असते. केस गळण्याची प्रक्रिया , तेव्हाच सुरु होते जेव्हा आपल्या केस कोशिका आराम करत असतात.

जेव्हा आपण तणावात असतो , त्या वेळी आराम करणाऱ्या केस कोशिकांची संख्या वाढते आणि परिणामी केस गळण्याची प्रक्रिया ही .

जर तणाव हे मुख्य कारण असेल  तर तो कमी केल्यास केस गळती थांबण्याचे  वैज्ञानिक प्रबळ पुरावे उपलब्ध  नाहीत.

६. स्वयंप्रतिरोधक रोग (autoimmune disease)

स्वयंप्रतिरोधक रोग  हे अश्या प्रकारचे रोग असतात, ज्या वेळी आपली रोग प्रतिकार क्षमता आपल्याच शरीरावर हल्ला करते. 

Alopecia areata नावाचा  एक असाच रोग आहे. जो आपल्या केस वाढवणाऱ्या क्षमते वर चुकून हल्ला करण्यास सुरुवात करतो.

या रोगावर उपचार केल्यास केस गळती थांबू शकते. मात्र , हा उपचार सर्वांनाच लागू होतो असे नाही.

तर ही तरुणाईत केस गळण्याची आणि पांढरे होण्याची कारणे आहेत. यापलीकडे तुम्हाला काही कारणे माहिती आहेत का ? आणि काही उपाय माहिती आहेत का ? खाली कमेंट्स करून जरूर कळवा

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %